‘त्या’ पोलीसांना सेवेतून केले कार्यमुक्त

0

जळगाव : भगवान हटकर मृत्यू प्रकरणात निलंबित केलेल्या दोन पोलिस कर्मचार्‍यांना सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी गुरूवारी दिली. तसेच कार्यमुक्त करण्याबाबतचेआदेश संबंधित विभागाकडे पाठविण्यात आले आहे.

रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल 72/2014 या गुन्ह्यात संशयित भगवान विजय हटकर (वय 35) याला अटक करण्यात आली होती. डिसेंबर 2014 रोजी सकाळी न्यायालयीन कामकाजासाठी भगवान हटकर याला राजेंद्र मधुकर चौधरी आणि श्रावण पांडुरंग पावरा या दोन्ही पोलिस कर्मचार्‍यांनी त्याला न्यायालयात नेले. त्यानंतर हटकर याला अस्वस्थ वाटत असल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी चौकशीत दोन्ही पोलिस दोषी आढळले होते. त्यानंतर दोघांविरूध्द जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यामुळे दोघांना निलंबीत करण्यात आले. बुधवारी त्यांना नौकरीतून कमी का करण्यात येवू नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. परंतू गुरूवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी संबंधित विभागाला दोषी ठरलेल्या दोन्ही कर्मचार्‍यांना खात्यातून कमी करण्याचे आदेश दिल्याने कर्तव्यात कसूर ठरलेले पोलीस कर्मचारी राजेंद्र मधुकर चौधरी आणि श्रावण पांडुरंग पावरा यांना सवेतून कार्यमुक्त करण्यात आले आहे.