त्या’ मयत वृद्धाचे कुटुंबीय कोरोना संशयित म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल

0

अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांची माहिती

जळगाव:भुसावळातील वृद्धाचा आज शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण समोर आले नाही. मात्र काही दिवसांपूर्वी ते विदेशातून परतलेले असल्याने त्यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचा संशय असून, या वृद्धाच्या कुटुंबातील पाच जणांना जिल्हा रुग्णालयातील कोरोना संसर्ग कक्षात उपचारार्थ दाखल करण्यात आले असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे यांनी दिली.

या पाचही जणांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले असून, तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. तसेच मयत वृद्धाचे मृत्यूचे नेमके कारण समोर यावे म्हणून शवविच्छेदन करण्यात आले आहे. सात ते आठ दिवसानंतर अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येण्याची शक्यता आहे. यात संबंधित पाच जणांव्यतिरिक्त शनिवारी एकही कोरोना संशयित दाखल झालेला नाही. आतापर्यंत दाखल सर्व संशयित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती डॉ.भास्कर खैरे यांनी दिली.