जळगाव । अॅसिड हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने खचलेल्या पण जिद्दीने परिस्थितीशी लढणार्या मुलीसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होममिनिस्टर रॅम्प या मुलीसोबत चालणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी खाजगी बँकेत काम करत आगळीवेगळी ओखळ निर्माण केली आहे. त्यांनी बेटी बचाओ यासाठी सुध्दा रॅम्प वाक केला होता.
अमृता फडणवीस या खाजगी बँकेत महत्वाच्या पदावर जबाबदारी साभांळत आहे. ’बेटी बचाओ’चा संदेश देण्यासाठी त्यांनी रॅम्प वॉक केला होता. त्यानंतर आता त्या अॅसिड हल्ल्यातील पीडितांना आधाराचा हात देणार आहेत.अमृता फडणवीस यांनी नुकतीच अॅसिड हल्ल्यातील जखमी मुलीना भेट दिली होती. त्यावेळी त्यांच्यातील आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती पाहून आश्चर्य वाटले. या मुलींना पीडित म्हणणे चुकचे ठरेल. शारीरिक व मानसिकदृष्टया ते दुखावलेत असून त्यांनी जिद्द सोडलेली नाही. अधिकारी, सेलिब्रिटी व मी या जेत्यांसोबत 5 मार्चला मुंबईत होणार्या कायर्ंक्रमात रॅम्प वॉक करणार आहोत. असे अमृता फडणवीस यांनी दिली.