‘त्या’ वक्तव्याबद्दल साध्वी प्रज्ञांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

0

नवी दिल्ली: २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले दिवंगत एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भोपाळमधील भाजपा उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विरोधात मध्य प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या वक्तव्याची चौकशी सुरु असल्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. काल एका कार्यक्रमात बोलताना साध्वी प्रज्ञा यांनी हेमंत करकरे यांनी मला खूप त्रास दिला आहे, ज्या दिवशी त्यांना दहशतवाद्यांनी मारले त्या दिवशी माझ्यावरील सुतक संपले असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.