बैठक गणसंख्येअभावी तहकूब
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील क्रीडा समिती सभापती संजय नेवाळे आणि संत तुकाराम नगरमधील टपरीचालकाच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या सुजाता पालांडे शुक्रवारी झालेल्या महापालिकेतील नियोजित क्रीडा समितीच्या पाक्षिक बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. याशिवाय अंबरनाथ कांबळे हे केवळ एकमेव सदस्य उपस्थित राहिल्याने बैठकीचे कामकाज होऊ न शकले नाही. त्यामुळे ही बैठक 22 जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज होणार्या क्रीडा समिती बैठकीला नेवाळे उपस्थित राहतात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, नेवाळे उपस्थित न राहिल्याने ही बैठक गणसंख्येअभावी तहकूब करावी लागली.
स्टॉल तोडफोड प्रकरण
चिखली परिसरातील दुकानाची तोडफोड करुन व्यवसायिकाला मारहाण केल्याप्रकरणी नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील सहभागी असलेल्या पाच आरोपींपैकी चार जणांना निगडी पोलिसांनी अटक केली आहे. तर पाचवा आरोपी नगरसेवक व सभापती संजय नेवाळे हे मात्र फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. संजय किवळे, प्रशांत खरात, मोहन खरात आणि स्वप्निल गाजरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी बदाराम भिकाजी देवासी (वय 24, सध्या रा. चिखली, मूळगाव रा. राजस्थान) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्याददार देवासी यांनी आपल्या दुकानासमोर चायनीज, ज्युस व पाणी पुरीचा स्टॉल लावला होता. रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास नेवाळे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत तेथे आले. त्यांनी देवासी यांना दुकानासमोर ÷स्टॉल लावायचा नाही, अशी धमकी दिली. त्यामुळे देवासी यांनी मालकाशी राजस्थानी भाषेत संवाद साधून परिस्थिती सांगितली. त्यावेळी नेवाळे यांच्यासोबत असलेल्या एका कार्यकर्त्याने देवासी याला मारहाण केली. तसेच दुकानाची तोडफोड केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याचे लक्षात येताच, कॅमेर्याची वायर काढून टाकली. याशिवाय संत तुकारामनगरमधील एका टपरीचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या टपरीचालकाने आपल्या सुसाईड नोट’मध्ये नगरसेविका सुजाता पालांडे या देखील अडचणीत सापडल्या आहेत.
पालांडे यांची यापुर्वीही अनुपस्थित
पालिकेतील या बैठकीला गणसंख्ये अभावी रद्द करण्यात आली. शुक्रवारी (दि. 8) क्रीडा समितीची पाक्षिक बैठक महापालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आली होती. या समितीचे सभापती असलेले संजय नेवाळे मारहाणप्रकरणी अटक टाळण्यासाठी फरार आहेत. तर गेली अनेक दिवसांपासुन नगरसेविका सुजाता पालांडे यादेखील महापालिकेत फिरकल्या नाहीत. यापुर्वी देखील फरार असलेले अनेक नगरसेवक महापालिका सभेला हजेरी लावत असल्याचे दिसून आले आहे.