चाळीसगाव । माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदच पवार यांचा 76 वा वाढदिवस आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या 50 वर्षेपूर्ती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यस्तरीय शालेय वक्तृत्व तसेच निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जळगांव जिल्ह्यातून चाळीसगाव येथील डॉ.काकासाहेब पुर्णपात्रे माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थीनी त्रिवेणी जगताप ही प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली होती. या अनुषंगाने या विद्यार्थीनीने खासदार शरद पवार यांची भेट घेतली. खासदार सुप्रिया सुळे यांनी या विद्यार्थीनीला भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.