आज सर्वपक्षीय रेल्वे रोको ; पाटबंधारे विभागाच्या आडमुठेपणाविरुद्ध संताप
भुसावळ : पाणी वापर संस्थांसह भुसावळ पालिका, रेल्वे व दीपनगर तसेच जळगाव एमआयडीसीकडे 104 कोटींची थकबाकी झाल्याने पाटबंधारे विभागाने हतनूर धरणातून आवर्तन सोडण्यास विलंब केला आहे त्याचा सर्वाधिक फटका भुसावळवासीयांना बसत आहे. मंगळवारी सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी डीआरएम प्रशासनाची भेट घेत थकबाकी भरण्याचे सूचवले तर रेल्वे प्रशासनाने नियमित रक्कम भरली जात असल्याचे सांगत पाटबंधारे विभागाने चुकीच्या पद्धत्तीने आकारलेल्या पाणीपट्टीबाबत नोटीस बजावल्याचे सांगितले. दरम्यान, बुधवारी दुपारी दोन वाजता रेल्वे स्थानकावर काशी एक्स्प्रेस रोखण्याचा इशारा सर्वपक्षीय पदाधिकारंनी दिला आहे.