थकीत बिलांची रक्कम भरण्यासाठी प्रशासन देणार अल्टिमेंटम

0

जळगाव । महापालिकेच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांना थकीत गाळेभाडे, मालमत्ताकराचे बिल बजावली होती. या बिलांपैकी काही रक्कम हरकत कायम ठेवून गाळेधारकांनी भरली असली तरी थकीत रक्कम भरण्यासाठी मनपा प्रशासन आता पंधरा दिवसांचा अल्टिमेंटम गाळेधारकांना देणार आहे. गाळेधारकांनी पैसे न भरल्यास गाळे जप्तीची कारवाई केली जाणार असल्याची विश्‍वसनीय माहिती मिळाली आहे. महापालिकेच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलांमधील गाळेकरारासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी अधिनियमात सुधारणा करणार असल्याचे सांगितले. परंतू त्याचा लाभ शहरातील गाळेधारकांना मिळणार नसल्याने 2012 पासून गाळाभाडे थकीत असल्याने ते भरल्याशिवाय पर्यायच नसल्याची बाब समोर येत आहे.

बिलातील थकीत रकमेचा बोझा
फुले मार्केट मधील गाळेधारकांना आज 60 लाखाचे बिलांचे वापट करण्यात आले. तर तीन महिन्याच्या बिलातून गाळेधारकांकडून 2 कोटी 90 लाख मालमत्ता कर, 1 कोटी 80 लाख गाळेभाडे येणे अपेक्षीत आहे. दरम्यान, गाळेधारकांनी गाळेभाडे, मालमत्ताकराचे थकीत बिल दिलेल्या मुदतीत न भरल्यास मनपा गाळे जप्तीची कार्यवाही करणार आहे. त्यासोबत थकबाकीदार गाळेधारकांच्या मालमत्तांवर बिलातील थकीत रक्कमेचा बोझा चढवीला जाणार आहे.

गाळे जप्तीचे संकेत
थकीत बिलांचे रक्कम भरण्यासाठी मनपा गाळेधारकांना पंधरा दिवसाची मुदत देणार आहे. त्यातच गाळ्यांच्या लिलाव प्रक्रिया करण्यासाठी गाळे जप्तीची कारवाई आधी करावी लागणार आहे. त्यामुळे 1 मे पासून गाळे जप्तीची कारवाई मनपा प्रशासनाकडून होण्याची शक्यता आहे. 18 व्यापारी संकुलातील 2 हजार 387 गाळेधारकांना तीन महिन्याच्या बिलांचे वाटप करण्याची प्रक्रियेला आज सुरवात झाली.

सन 2018 ची बिले
यातच आता 2018 या वर्षाचे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्याचे गाळेभाडे, मालमत्ताकराचे बिले गाळेधारकांना आज वाटप करण्याची सुरवात किरकोळ वसुली विभागाकडून सुरवात करण्यात आली. थकीत बिलांची रक्कम पंधरा दिवसात भरण्याचा अल्टिमेंटम प्रशासन गाळेधारकांना देणार असल्याचे माहिती समोर येत आहे.