‘थलायवा’चा आज ६८वा वाढदिवस

0

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत हे फक्त दाक्षिणातच नाही तर संपूर्ण भारतच सुपरस्टार आहे. आज या सुपरस्टारचा ६८ व्या वाढदिवस आहे. राजनीकांत म्हंटल की चित्रपट हिट असं मानले जाते. रजनीकांत कोणासाठी ‘थलायवा’ तर कोणासाठी ते देव आहेत. फक्त दक्षिणेतच नाही तर जपानमध्येही रजनीकांत यांना मानणारे लोक आहेत. राजनीकांत जरी सुपरस्टार असले तरी त्याचं राहणं एकदम साध आहे आणि हे त्यांच्या चाहत्यांना खूप आवडतं.

सोशल मीडियावर फारसे सक्रिय नसणाऱ्या रजनीकांत २०१३ मध्ये ट्विटरवर आले. यांचे ५१ लाखांहून अधिक फॉलोअर्स ट्विटरवर आहेत. मात्र इतर कलाकारांच्या तुलनेत ट्विटवर सक्रिय असण्याचं त्यांचं प्रमाण खूपच कमी आहे. ट्विटरवर ते फक्त २४ जणांना फॉलो करतात. यात महानायक अमिताभ बच्चन या केवळ एकाच बॉलिवूड कलाकाराचा समावेश आहे. याव्यतिरिक्त मुलगी सौंदर्या, ऐश्वर्या, जावई धनुष, संगीतकार ए.आर. रेहमान, संगीतकार अनिरुद्ध रवीचंद्र आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही फॉलो करतात. या यादीत काही वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनींच्या अधिकृत ट्विटर हँडलचाही समावेश आहे.