थायबॉक्सिंग अ‍ॅण्ड सेल्फ डिफेन्स अकॅडमीच्या खेळाडुंचे यश

0

पिंपरी-चिंचवड : पिंपरी, मोहनगरातील थायबॉक्सिंग अ‍ॅण्ड सेल्फ डिफेन्स अकॅडमीच्या सहा खेळाडुंनी ओपन थायबॉक्सिंग स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. या सर्व खेळाडुंची आता शिर्डी येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्तरावरील थायबॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

यशस्वी खेळाडू असे
थायबॉक्सिंग अ‍ॅण्ड सेल्फ डिफेन्स अकॅडमीच्या अर्णव जाधव, सुमित यादव, श्रावणी आवडे, शौर्य जोशी, श्‍लोक कुदळे, इशिता कुदळे यांनी आकुर्डीतील बीना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पार पडलेल्या ओपन थायबॉक्सिंग स्पर्धेत यश मिळवले. या सर्व खेळाडुंची शिर्डी येथे 13 सप्टेंबर रोजी होणार्‍या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशस्वी खेळाडुंना अकॅडमीचे प्रशिक्षक अमोल घोडके, सुशांत कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.