चिंचवड : घरात घुसून 16 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना थेरगाव येथे रविवारी (दि.22) दुपारी बाराच्या सुमारास घडली. या प्रकरणी एका तरूणाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी रवी घासीराम जाटव (वय 26, रा. डोंगरे कार्नर, थेरगाव. मूळगाव नागाँव, मध्यप्रदेश) असे त्याचे नांव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी पीडित मुलीच्या घरातील सर्वजण कामाला गेले होते. त्यावेळी रवी दगड कापण्याची मशिन आणण्याचा बहाणा करून घरात घुसला. त्यावेळी घरामध्ये पीडित मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत त्यांने दरवाजा बंद केला. तसेच त्याने त्या मुलीला मारहाण करून ठार मारण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केला. अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.