मुक्ताईनगर : तालुक्यातीळ थेरोळा गावालगतच्या पूर्णा नदीपात्रात रविवारी सकाळी एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. या वाघाच्या पायाला ठिबकच्या नळ्या बांधलेल्या असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वढोडा वनक्षेत्राधिकारी व त्यांचे सहकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.