मुक्ताईनगर : तालुक्यातील थेरोळा शिवारात मंगळवार, 12 रोजी गावठी दारूभट्टी चालकाविरोधात कारवाई करून त्यास अटक करण्यात आली. मंगळवारी सकाळी नऊ वाजता ईश्वर बाळू बेलदार (40, थेरोळा) यास गावठी दारूभट्टी चालवताना पकडण्यात आले. 300 लिटर गावठी हातभट्टीची दारू तसेच 35 लिटर प्लास्टिकच्या कॅनमधील 105 लीटर तयार दारू मिळून सुमारे एक लाख पाच हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शेताच्या बांधावरही कारवाई
महादेव जग्गु बेलदार यांच्या शेताच्या बांधावर नदी काठी गावठी हातभट्टीची दारू बनविन्याची भट्टी सुरू असताना पोलिसांनी कारवाई करीत कच्चे रसायनासह तयार दारू मिळून सुमारे 39 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयीत आरोपी महादेव बेलदार हा पसार झाला. ही कारवाई पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शेवाळे, पोलिस उपनिरीक्षक राहुल बोरकर, पोलिस कॉन्स्टेबल सागर सावे, संभाजी बिजागरे, राहुल नावकर, प्रदीप इंगळे, गोपीचंद सोनवणे आदींच्या पथकाने केली.