यावल- तालुक्यातील थोरगव्हाण येथील एका 26 वर्षीय तरूणाची मस्करी केल्याचा राग आल्याने मस्करी करणार्यास मारहाण करण्यात आली. त्याचा राग येवून त्या तरूणास सहा जणांनी जबर मारहाण केल्याची घटना 2 जुलै रोजी घडली. या प्रकरणी शनिवारी यावल पोलिसात सहा जणां विरूध्द दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सुनील संतोष चौधरी (26, रा.थोरगव्हाण) यांच्या फिर्यादीनुसार ते 2 जुलै रोजी सुजदा, ता. जळगाव येथे काशिनाथ कोळी यांच्या शेतात वखरणी करीत असताना ईश्वर दौलत भालेराव (रा.थोरगव्हाण) हा मद्यधूंद अवस्थेत आला व त्याने चौधरीस शिविगाळ करीत टिंगल, मस्करी केली. त्याचा राग येवून चौधरीने त्यास मारहाण केली तर या मारहाणीचा राग येत सांयकाळी मनवेल-थोरगव्हाण रस्त्यात असलेल्या भोनक नदीच्या पात्रात सुनील संतोष चौधरी यास ईश्वर दौलत भालेराव, सुनील दौलत भालेराव, विकास अरूण भालेराव, श्रावण प्रकाश भालेेराव, सागर भालेेराव मुमराबाद व राहुल ईश्वर भालेराव या सहा जणांनी नदीपात्र गाठत वरील भांडणाच्या कारणावरून चौधरी यास गळ्याच्या भोवती दोरीने फास लावला, पाण्यात बुडवले व लाठ्या काठ्यांनी डोक्यावर जबर दुखापत केली. यात काही जणांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमी अवस्थेत चौधरी यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार्थ दाखल केले. सहा आरोपींविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक एम.जे.मोरे करीत आहेत.