थोरगव्हाण सरपंचपदी उमेश सोनवणे

0

यावल- तालुक्यातील थोरगव्हाण ग्रामपंचायतीसह विविध ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी बुधवारी तहसील कार्यालयात तहसीलदार कुंदन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी करण्यात आली. थोरगव्हाण सरपंचपदी उमेश देवराम सोनवणे (651) मते मिळवून विजयी झाले. तर प्रतिस्पर्धी समाधान मंगल सोनवणे यांना ( 559 ) मते मिळाली. ग्रामपंचायतीच्या तीन प्रभागात सात जागांसाठी निवडणूक झाली. पैकी प्रभाग क्रमांक तीनमध्ये यशोदा अनिल भालेराव व गोपाळ शालिक पाटील यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरीत विजयी उमेदवार असे- प्रभाग क्रमांक एक- हिरालाल शामराव चौधरी (251), पद्माबाई विनोद पाटील (251), ज्योती केवल पाटील (249), प्रभाग क्रमांक दोन- मनोहर कृष्णा पाटील (301), सिंधुबाई राजेंद्र पाटील (287), मथुराबाई जगदीश पाटील (260), प्रभाग क्रमांक तीन- अशोक गोबा भालेराव (165) मते मिळवून विजयी झाले.

नायगावला मुस्तफा तडवी विजयी : नायगाव येथे पोटनिवडणुकीत प्रभाग क्रमांक तीनमध्ये अनुसूचित जमाती पदासाठी झालेल्या 647 मतदांना पैकी मुस्तफा अरमान तडवी (370 मते) मिळवून विजयी झालेत तर सौखेडासीम येथे प्रभाग क्रमांक पाचमध्ये ना.मा.प्र. पदासाठी झालेल्या 331 मतदांनापैकी देविदास पाटील (167 मते) मिळवून विजयी झाले. न्हावी प्र.अडावद येथे प्रभाग क्रमांक दोनमध्ये अनुसूचित जमाती पदासाठी झालेल्या 532 मतदाना पैकी संगीता शांताराम सोनवणे (285) मते मिळवून विजयी झाल्या. डांभूर्णी येथे प्रभाग क्रमांक दोनमध्ये अनुसूचित जमातीपदासाठी झालेल्या 675 मतदानांपैकी संजीव गंभीर कोळी हे (601) मते मिळवून विजयी झाले.