दंगलखोर एकबोटेंसह भिडेंच्या अटकेसाठी लाक्षणिक उपोषण

0
भुसावळ – भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी रोजी उसळलेल्या दंगलीला जवाबदार असणार्‍या मिलिंद एकबोटेसह संभाजी भिडे यांना अटक करावी तसेच दंगलीत ज्या कार्यकर्त्यांच्या वाहनाचे नुकसान झाले त्याची पंचनामा करून भरपाई द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी भारीपंतर्फे प्रांताधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. प्रसंगी मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.
अशा आहेत मागण्या
दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण राज्यभरात दलित तरूण व नागरीकांवर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल असून त्यामुळे त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे ही बाब लक्षात घेवून सदरचे गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावे, महागाई निर्देशांकनुसार भारत सरकार शिष्यवृत्तीची रक्कम उत्पन्नानुसार सरसकट वार्षिक रुपये पाच लाख करण्यात यावी व ती सर्व प्रवर्गास लागू करावी, विद्यार्थ्यांचा निवासी भत्ता दरमहा एक हजार 500 करण्यात यावा, ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी ह्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाढवून सरसकट 100 टक्के करावी आदी मागण्या करण्यात आल्या.
यांचा धरणे आंदोलनात सहभाग
भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश इखारे, जिल्हा सचिव संजय सुरळकर, माजी तालुकाध्यक्ष मनोहर सपकाळे, जिल्हा मार्गदर्शक विश्‍वनाथ मोरे, भुसावळ शहराध्यक्ष गणेश इंगळे, तालुका युवा अध्यक्ष प्रमोद बावस्कर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते धरणे आंदोलनात सहभागी झाले.