जळगाव । तालुक्यातील आव्हाणे गावी पूर्ववैमनस्य व शेतात बकर्या व गुरे चरायला नेल्याच्या कारणावरून दोन गटात 4 रोजी वाद होवून हाणामारी झाल्याची घटना घडली होती. यानंतर याप्रकरणी तालुका पोलिसात अॅट्रॉसिटी व दंगलीचा गुन्हा दाखल झाला होता. तर आज सोमवारी दंगलीच्या गुन्ह्यातील चार संशयितांना न्यायाधीश एम.एम.चौधरी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना 15 जुनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आव्हाणे येथे दोन गटात हाणामारी
आव्हाणे येथे 4 जुन रोजी दोन गटात वाद होवून हाणामारी झाली होती. त्यानंतर तालुका पोलिस ठाण्यात दंगलीचा व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, पोलिसांनी या घटनेतीच काही संशयितांना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असून होते. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, दंगलीतील गुन्ह्यातील बंटी उर्फ दत्तु जोंगेद्र अरूण साळुंखे (वय-27), अरूण बुधा उर्फ गोविंदा साळुंखे (वय-55), राजेंद्र कालीदास सोनवणे (वय-35), लक्ष्मीकांत अरूण साळुंखे (वय-23, सर्व रा. आव्हाणे) या चौघा संशयितांना अटक केली आहे. त्यांना आज सोमवारी न्यायाधीश एम.एम. चौधरी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणी न्यायालयात कामकाज होवून न्या. चौधरी यांनी चौघांना 15 जुनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अॅड. निखील कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले.
चोरट्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
जळगाव- दौलतनगरातील पाण्याच्या टाकीजवळ भरत शांताराम पाटील (वय 33) यांच्या घरात चोरट्यांनी त्यांच्या घरात चोरी करत एक एलइडी टिव्ही, एक इस्त्री, कॅमेरा, पितळाची समई असा 28 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरून नेत असतांना राहूल नवल काकडे व सागर आनंद गायकवाड या दोन्ही चोरट्यांना रामानंद पोलिसांनी पकडले होते. त्यानंतर त्यांना 12 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. सोमवारी त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपली असता त्यांना न्यायाधीश के.एस. कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.