दंगलीत पोलिसांचे खच्चीकरण; वरिष्ठांनी चिंतन करावे

0

नंदूरबार। शहरात घडणार्‍या प्रत्येक दंगलीत पोलीस कर्मचार्‍यांनाच मार खावा लागत असल्याने चिंतेचा विषय बनला आहे, वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी यावर चिंतन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे,त्यामुळे पोलिसांचे खच्चीकरण होते. नंदुरबार शहरात आता पर्यंत जेव्हा ही जातीय वणवा पेटला आहे, तेव्हा दोन्ही जमावाच्या मध्यभागी असलेले पोलीसच दगड फेकीत जखमी झाले आहेत,ही वस्तुस्थिती आहे.

पोलीसांसमोर दगडफेक सुरू असताना, जाळपोळ होत असताना ते काहीच करू शकत नाहीत,कारण त्यांना वरिष्ठांचा आदेश नसतो, त्यामुळे ते बिचारे गुपचूप दगड विटांचा मार सहन करीत असतात.नुकत्याच झालेल्या दंगलीत देखील अधिकार्‍यांसह 7 पोलीस जखमी झाले आहेत. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी पोलिसांच्या मानसिकतेचा ही विचार करणे गरजेचे आहे, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.