दंगल गर्ल्सचा डान्स पाहिलात का?

0

नवी दिल्ली-कुस्तीपटू महावीर फोगट यांच्या जीवनावर आधारित असलेला २०१६ मधील दंगल चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करून गेला. या चित्रपटात अमीर खान याने महावीर फोगट यांची भूमिका साकारली आहे. तर त्यांच्या मुलीच्या भूमिकेत फातिमा सना आणि सान्या मल्होत्रा आहेत. या चित्रपटानंतर फातिमा सना आणि सान्या मल्होत्रा यांना दंगल गर्ल्स म्हणून ओळखले जाते.<

/p>

दरम्यान सध्या फातिमा सना आणि सान्या मल्होत्रा यांचा नृत्य करीत असतांनाचा एक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. “दिलबर दिलबर” या गाण्यावर फातिमा सना आणि सान्या मल्होत्रा नृत्यू करत असतांना दिसत आहे. त्याच्या हा नृत्यू चाहत्यांना खूपच आवडला आहे.