दंडात्मक कारवाई

0

पिंपरी-चिंचवड । उघड्यावर शौचास जाणार्‍या नागरिकांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. वाकड येथील 17 जणांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून सात हजार 300 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हगणदारी मुक्त महाराष्ट्रासाठी शासनाच्या वतीने शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. राज्य शासनाकडून हगणदारी मुक्त महानगरपालिका करण्यासाठी सक्त निर्देश देण्यात आले आहेत.

उघड्यावर शौचास जाणार्‍या वाकड, काळाखडक झोपडपट्टी येथील सहा, अण्णा भाऊ साठेनगर झोपडपट्टीतील सात आणि थेरगाव येथील चार अशा एकूण 17 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई ’ब’ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी संदीप खोत, सहाय्यक आरोग्य अधिकारी कुंडलिक दरवडे, आरोग्य निरीक्षक योगेश फल्ले, सदाशिव पुजारी यांनी केली.