दगडफेकीत दोघे जखमी : दोघांविरोधात गुन्हा

Two injured in stone pelting at Lohara सावदा :  जवळच असलेल्या लोहारा येथे दगड भिरकावल्याने दोघे जखमी झाले. ही घटना बुधवार, 5 रोजी रात्री 9.30 वाजता घडली. या प्रकरणी सावदा पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांविरोधात गुन्हा
सारूबाई उखा चव्हाण (43, लोहारा) यांच्या तक्रारीनुसार, बुधवारी रात्री संशयीत राजू ओमाशा बारेला व मोहम्मद हैदर तडवी (लोहारा) यांनी दगड भिरकावल्याने स्वतःसह ममराज पवार (रा.लोहारा) हे जखमी झाले. तपास हवालदार युसूफ तडवी करीत आहेत.