चाळीसगाव । तालुक्यातील दडप्रिंप्री येथील वाल्मिक दौलत पाटील यांच्या घरातील धान्य व संसारउपयोगी वस्तुंसह शेजारीच लागलेल्या आगीत 8 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास अचानक आग लागून दोन्ही घरातील संसार उपयोगी वस्तुंसह धान्य व कापुस जळून जवळपास 7 लाखाचे नुकसान झाल्याची घटना घटली आहे.
तालुक्यातील दडप्रिंप्री येथील रहिवासी वाल्मिक दौलत पाटील यांच्या राहते घरी शुक्रवार 8 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास अचानक आग लागून जवळपास 60 क्विंटल कपाशी, 2 गव्हाचे पोते, 2 पोते बाजरी तसेच 1 ढेपेचे पोते व घरातील संसारपयोगी वस्तू आगीत जळुन खाक झाल्या असुन बाजुलाच असलेल्या जब्बरसिंग सुदाम पाटील यांच्या घराला ही आग लागल्याने 15 ते 16 क्विंटल कपाशीसह संसारपयोगी वस्तुसह जवळपास 1 लाखाचे नुकसान झाले आहे. आग लागल्याने घडलेल्या दोन्ही घटनेत जवळपास 7 लाखांचे नुकसान झाले आहे. आगीचे माहिती मिळताच ग्रामस्थांनी आग विजविली. मात्र आग कश्यामुळे लागली याचे कारण कळून आले नाही. या प्रकरणी कैलास वजेसिंग पाटील (वय-50) यांच्या खबरीवरुन मेहुणबारे पोलीस स्टेशनला आगीची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोहेकॉ भालचंद्र पाटील करीत आहेत.