दत्तवायपूर येथे श्रीकृष्णाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

0

शिंदखेडा। तालूक्यातील दत्तवायपूर येथील दत्तमंदिरात श्रीकृष्णाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा महानूभव पंथातील संत, महंत व भाविकांट्या उपस्थितीत संपन्न झाला. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आचार्य वल्हेराज भोजने यांच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आचार्य प्रवर बीडकर बाबा रणाईचे होते.

या धार्मिक कार्यक्रमाच्या निमीत्ताने श्रीकृष्णाच्या मूर्तीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. भाविकांनी चौका-चौकात मनोभावे आरती व पूजन केले.यावेळी मंगलस्नान, गीतापाठ, कलसारोहण, ध्वजारोहण आदि कार्यक्रम घेण्यात आले. मंदिराचा कलसारोहण व ध्वजारोहण आचार्य साळकर धुळे तर दिपप्रज्वलन आचार्य जयराज मोहाडीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते संदिप कपारे उपस्थित होते.