दप्तर कादंबरीतून जामनेरात प्रकाशन

0

जामनेर । जामनेर तालुका शिक्षक मित्र मंडळाच्या वतीने पंचायत समितीच्या सभागृहात दप्तर या कादंबरीतून कवी डॉ.अशोक कौतीक कोळी यांनी ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांच्या शालेय काळातील जिवनपट चितारला आहे. कवी डॉ. कोळी यांच्या दप्तर या कादंबरीचे रविवार 12 रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्यावेळी मान्यवरांनी वरील भावना व्यक्त केल्या. दप्तर हा लहाणपनापासूनच सगळ्यांचा आवडीचा प्रवास. ते कस असावे, कोणत्या रंगाच असावे, त्यातल्या त्या छोटेखानी आठवणी आपल्याला आयुष्यभर साथ देतात. असे असले तरी ग्रामिण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या वाट्याला मात्र वायरची पिशवी किंवा प्लॅस्टीकची कॅरीबॅग हेच त्यांच्यासाठी लाख मोलाच दप्तर असत. असा हा दप्तर विषय घेऊन कवी डॉ.कोळी यांनी खेड्यातील विद्यार्थ्यांचा जवनपट आपल्या कादंबरीत चितारला आहे.
कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून गटविकास अधिकारी अतूल जोशी, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, गटशिक्षणाधिकारी आदीनाथ वाडकर, माजी तहिसलदार डी.बी.पाटील, डी.डी.पाटील यांचेसह मान्यवर, श्रोते वाचकांची उपस्थीती होती.