दबंग खान सुरु करतोय थिएटर्स

0

मुंबई-दबंग खान सुपरस्टार सलमान खान चित्रपट प्रोजेक्टमध्ये नेहमी व्यस्त असतो. त्यात स्वत: च्या कपड्यांसाठी, टेलिव्हिजन शोमध्ये व्यस्त असणारा सलमान खान आता स्वतचे चित्रपट थिएटर्स लॉन्च करीत आहे. याला ‘सलमान टॉकिज’ असे नाव देण्यात येणार आहे. यात थिएटर्समध्ये तिकीट देखील स्वस्त असणार आहे. या थेटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी येणाऱ्यांना तिकीट करमुक्त असणार आहे. शिवाय वंचित घटकातील मुलांना याठिकाणी मोफत चित्रपट दाखविले जाणार आहे. हे थिएटर्स मुंबईत असणार आहे.