दभाशीच्या लाचखोर तलाठ्याला एक दिवसाची पोलीस कोठडी

0

दोन हजारांची लाच घेताना धुळे एसीबीने केली होती अटक

शिंदखेडा- तालुक्यातील दभाशी येथील तलाठी गुलाब बाबूराव पवार (57) यांना दोन हजारांची लाच घेताना धुळे एसीबीने बुधवारी शिंदखेडा तहसील कार्यालयातील व्हिडिटो कॉन्फ्रन्स रूमच्या प्रवेशद्वाराजवळ रंगेहाथ अटक केली होती. विशेष म्हणजे आरोपी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाच झालेल्या या कारवाईने भ्रष्टाचारांच्या गोटात खळबळ उडाली आहे. आरोपीला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यास एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. श्रावण बाळ योजना व विधवा पेन्शन योजनेंतर्गत सादर करण्यात आलेल्या 32 अर्जावर स्वाक्षरी करण्यासाठी पवार यांनी दोन हजारांची लाच मागितली होती. धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर लाचेची पडताळणी झाल्यानंतर आरोपीला सापळा रचून अटक करण्यात आली. ही कारवाई धुळे एसीबीचे उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर, पोलीस निरीक्षक पवन देसले, हवालदार नरेंद्र कुलकर्णी, जयंत साळवे, संदीप सरग, संतोष हिरे, सतीश जावरे, कृष्णकांत वाडीले, प्रशांत चौधरी, कैलास जोहरे, शरद काटके, भूषण खलाणेकर, सुधीर सोनवणे, प्रकाश सोनार, संदीप कम, सुधीर मोरे आदींच्या पथकाने केली होती. दरम्यान, आरोपीच्या घर झडतीत काहीही आढळले नसल्याचे निरीक्षक महेश भोरटेकर यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.