भुसावळ प्रतिनिधी । हतनूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे या धरणाचे ३६ दरवाजे उघडण्यात आले आहेत.
हतनूर धरणाची जलपातळी वाढल्याने गुरुवारी २४ तर शुक्रवारी सकाळी एकूण ३६ दरवाजे पूर्ण उघडून विसर्ग करण्यात आला. यामुळे जिल्हा प्रशासनाने तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर हतनूर बॅकवॉटरमध्ये येणार्या रावेर, मुक्ताईनगर आदी तालुक्यातील गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हतनूरच्या विसर्गामुळे तापी नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे.