दमा रोगाविषयी जनजागृती

0

जळगाव । जगातील सुमारे 25-30 कोटी लोक दमा या रोगाने ग्रस्त आहे. दमा आजाराला नियंत्रणात आणण्यासाठी ग्लोबल इनिसीटीव्ह अगेंस्ट अस्थमा(जीना) ही संस्था 1993 पासून कार्यरत आहे. या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून 1998 पासून 2 में रोजी जागतिक दमा दिन साजरा करण्यात येत आहे. जागतिक दमा दिनानिमित्त दमा रोग विषयक जनजागृती व दमा रोगग्रस्त रुग्णांना प्रोत्साहन देण्यासाठी ’तुम्ही तुमचा दमा आटोक्यात आणु शकता’ अशी संकल्पना जीना संस्थेतर्फे राबविण्यात येत आहे. दमा दिनानिमित्त आजार आटोक्यात आणण्यासासाठी मार्गदर्शन तसेच विविध शंकेचे निरसन करण्यात आले. प्रतापनगरातील श्रीगणेश हॉस्पीटलचे डॉ.गुणवंत महाजन यांनी दमा रोग विषयी मार्गदर्शन केले. दमा रोग होण्याची कारणे, त्यावर उपाय या विषयी जीना संस्थेमार्फत जनजागृती करण्यात येत असते. आयुर्वेदिक औषधोपचाराने दमा रोग नियंत्रणात आणता येईल या विषयी रुग्णांना मार्गदर्शन करण्यात आले.