हिंजवडी : बंद घराचा दरवाजाची कडी कोयंडा उचकटून तीन लाख 101 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना राक्षेवस्ती मान येथे गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. आशा बापू राक्षे (वय 30, रा. राक्षे वस्ती, मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राक्षे यांचे घर गुरुवारी रात्री बंद होते. रात्री साडेनऊच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचा बंद दरवाजाची कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटामध्ये ठेवलेले तीन लाख 10 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने घरफोडी करून चोरून नेले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.