दरवाढीविरोधात सोमवारी काँग्रेसचे आंदोलन

0

शहापूर । वारंवार होणार्‍या पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात सोमवारी 18 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता शहापूर मध्ये काँग्रेसचे आंदोलन होणार आहे. याबाबत काँग्रेसचे शहापूर तालुकाध्यक्ष महेश धानके यांनी सोशल मीडियावर काढलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार मागील एक महिन्यात पेट्रोल, डिझेल, आणि गॅसच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सर्वसामान्य लोकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. परिणामी महागाईचा भडका उडाला आहे.

या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशाने व जिल्हा अध्यक्ष तथा माजी खासदार सुरेश टावरे यांच्या सूचनेनुसार सोमवार 18 सष्टेबर रोजी सकाळी साडेदहा वाजता तहसीलदार कार्यालय, शहापूर येथे आंदोलन करण्यात येणार आहे. तरी शहापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सकाळी सोमवारी दहा वाजता काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात उपस्थित रहावे असे आवाहन महेश धानके तालुका अध्यक्ष यांनी केले आहे.