भुसावळ- बाजारपेठ पोलिस ठाण्यात 25 एप्रिल 2019 रोजी दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील दोन संशयीत शेख अजिमोद्दीन शेख रीयलउद्दीन (रा.ग्रीन पार्क, भुसावळ) व शेख जुबेर शेख अहमद बरकतउल्ला (रा. नवी इदगाह, भुसावळ) हे गुन्हा दाखल झाल्यापासून पसार होते. हे संशयीत शहरातील खडका चौफुली येथे आल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक देवीदास पवार यांना मिळाल्याने त्यांनी तात्काळ पोलिस उपनिरीक्षक मनोज ठाकरे, किशोर महाजन व विकास सातदिवे यांनी आरोपींना अटक करण्याच्या सूचना केल्यानंतर पथक घटनास्थळी पोहोचताच संशयीत पळू लागले मात्र पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, संशयीतांनी 25 एप्रिल 19 रोजी तक्रारदार शेख मोहंमद फारून शरीफोद्दीन यांना तलवार व लोखंडी रॉडने मारहाण केली होती तसेच शे. मोहंमद यांच्या खिश्यातील 35 हजार रूपये काढून पोबारा केला होता.