दरोड्यापूर्वीच तिघे पारोळा पोलिसांच्या जाळ्यात

पारोळा : दरोड्याच्या तयारीत असणार्या टोळीतील तिघांना पारोळा पोलिसांनी अटक केल्याने अप्रिय घटना टळली आहे.

पारोळा पोलिसांची सतर्कता
पारोळा पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पारोळा येथील गोल्डन बियर शॉपीजवळ अंधारात पाच संशयित दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी सापळा रचून तीन दरोडेखोरांना अटक केली. यातील भूषण धनराज पाटील, प्रशांत उर्फ बंटी नाना पाटील आणि ज्ञानेश्वर उर्फ भुर्या वसंत पाटील या तिघांना ताब्यात घेण्यात आले तर यावेळी दोघे जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.

आरोपींकडून दरोड्याचे साहित्य जप्त
पोलिसांनी भूषण धनराज पाटील याच्याकडून चाकू व मिरचीपूड; प्रशांत उर्फ बंटी नाना पाटील याच्याकडून दोर तर ज्ञानेश्वर उर्फ भुर्या वसंत पाटील याच्याकडून टॉर्च व स्टम्प जप्त केला. तर सुनील लक्ष्मण पाटील व पलटी उर्फ विजय चौधरी पसार झाले असून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.