दरोड्यापूर्वीच पाच जणांची टोळी जाळ्यात : तीन गावठी कट्टे व 17 जिवंत काडतूस जप्त

चोपडा : गावठी कट्ट्यांच्या धाकावर जिल्ह्यात मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला चोपडा ग्रामीण पोलिसांसह नाशिक आयजींच्या विशेष पथकाने अटक केली आहे. या प्रकरणी सहा जणांवर चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, अटकेतील आरोपींच्या ताब्यातून तीन गावठी कट्टे, 17 जिवंत काडतूससह चारचाकी मिळून सहा लाख 57 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

या आरोपींना पथकाकडून अटक
चोपडा तालुक्यातील लासून ते सत्रासेन रोडवर असलेल्या उत्तम नगर गावापासूनजवळ असलेल्या घाटात काही दरोडेखोर हातात बंदूक घेवून दबा ठेवून असल्याची गोपनीय माहिती संयुक्त पथकाला मिळाल्यानंतर आरोपींच्या शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मुसक्या आवळण्यात आल्या. रवींद्र वसंत खारगे (24, रा.वडगाव बु.॥, सदाशीव दांगटनगर, पुणे), जिजाबा मल्हारी फाडके (39, रा.वडगाव बु.॥, तुकाईनगर, पुणे) चाँदपाशा अजीज शेख (32, रा.वडगाव बु.॥, तुकाईनगर, पुणे), जयेश लक्ष्मण भुरुक (24, वडगाव बु.॥, सदाशीव दांगटनगर, पुणे), सतनामसिंग महारसिंग जुनैजा (उमर्टी, ता.वरला, जि.बडवानी, मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली तर एक संशयीत पसार झाला. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात हवालदार मनोज दुसाणे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमरसिंग विसावे करीत आहे.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
नाशिक आयजींच्या विशेष पथकातील वरीष्ठ निरीक्षक बापू रोहम, सहाय्यक निरीक्षक सचिन जाधव, एएसआय बशीर तडवी, हवालदार रामचंद्र बोरसे, हवालदार सचिन धारणकर, हवालदार शकील शेख, नाईक मनोज दुसाने, नाईक कुणाल मराठे, नाईक प्रमोद मंडलिक, नाईक सुरेश टोंगारे, चोपडा ग्रामीणचे निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे, हवालदार राकेश पाटील, नाईक प्रमोद पारधी, नाईक किरण धनगर, नाईक किरण पाटील आदींना अटक करण्यात आली.