जळगाव – मोगरा फुलला…, अजीब दास्ता है ये…, सोला बरस की बाली उमर को सलाम… या व अशा अनेक दर्जेदार, बहारदार गीतांच्या सादरीकरणाने डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात संगीतप्रेमींनी भारतरत्न लतादीदी यांना आदरांजली वाहण्यात आली.
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ.केतकी पाटील सभागृहात नुकतीच लतादीदींनी गीतांच्या सादरीकरणाद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनच्या प्रेरणास्त्रोत गोदावरी पाटील, अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.मौसमी लेंढे, रजिस्ट्रार प्रविण कोल्हे, स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ.माया आर्विकर, डॉ.अनुश्री अग्रवाल,मीडिया क्षेत्रातील यामिनी कुलकर्णी, कृषी महाविद्यालयाचे परिसर संचालक डॉ.एस.एम.पाटील, मेडिसीनतज्ञ डॉ.सी.डी.सारंग, संगीत महाविद्यालयाच्या प्राचार्य पद्मजा नेवे आदि उपस्थीत होते.
भारतरत्न स्व.लता मंगेशकर यांनी आयुष्यभरात गायिलेल्या मराठी, हिंदीतील निवडक गाण्यांचे सादरीकरण गोदावरी संगीत महाविद्यालयाच्या प्राचार्य पद्मजा नेवे, जळगांव ललील शाळेच्या रंजना कदमबांडे, स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. माया आर्विकर,वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ.एन. एस. आर्विकर, डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल भुसावळचे शिक्षक मंदार पवार व प्रज्ञा सुरडकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड , गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज च्या प्राध्यापिका भावना झांबरे, मयुरी चिरमाडे आदी संगीतप्रेमींनी सादर करुन लतादीदींनाआदरांजली वाहिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी कुलकर्णी यांनी केले.
या गीतांचे सादरीकरण
मोगरा फुलला…, सोला बरस की बाली उमर को सलाम… लग जा गले, ये शाम की तन्हाइयां, अजीब दास्तान है ये, रहे ना रहे हम, तुझसे नाराज नही जिंदगी, ओ मेरे दिल के चैन, तेरी बिंदिया रे, तेरी आँखो के सिवा, एक प्यार का नगमा हैं,तू जहाँ जहाँ चलेगा मेरा साया, चांद फिर निकला, तूने ओ रंगीले कैसा जादू किया, कूहू कूहू बोले कोयलिया,नाम गुम जायेगा, ए मेरे वतन के लोगो, अखेरचा हा तुला दंडवत! या गीतांचे सादरीकरण करण्यात आले.