दर्दी प्रेक्षकाने ५१ हजारचे दिले बक्षीस

0

मुंबई : शिवाजी नाटयगृहात अनन्या’ नाटकाने भारावलेल्या एका प्रेक्षकाने अभिनेत्री ऋतुजा बागवेच्या अभिनयाला मनमुराद अशी दाद दिली . या नाटकात मुख्य भूमिका साकारणाऱ्या ऋतुजाला  या अनामिक प्रेक्षकाने तब्बल ५१ हजार रुपयांचे बक्षिस देत कौतुक केले.

नाट्य कलेवर प्रेम करणारे अनेक दर्दी प्रेक्षक असतात . अभिनेत्री ऋतुजा बागवे नाटकात मुख्य भूमिका साकारत आहे. रविवारी या नाटकाचा प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिरात पार पडला. त्यावेळी उपस्थित असणाऱ्या एका प्रेक्षकाला ऋतुजाचा अभिनय चांगलाच भावला. त्यांनी त्याच ठिकाणी नाव न जाहीर करण्याच्या विनंतीवर तिला ५१ हजाराच्या रक्कमेचा चेक देऊन कौतुक केले. आयुष्यातील हा क्षण कधीच विसरणार नसल्याची प्रतिक्रिया अभिनेत्री ऋतुजाने व्यक्त केली.कौतुक म्हणून मिळालेल्या या रकमेतील काही रक्कम ही दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थेला देणगी म्हणून देणार असल्याचे ऋतुजाने सांगितले. यापुढे अधिक चांगले काम करण्याची जबाबदारी वाढली असल्याचे तिने म्हटले.