नंदुरबार। बान्द्रा एक्सप्रेस ही नंदुरबार जिल्ह्यातील प्रवासी नागरिकांसाठी दर रविवारी हमसफर या संपूर्ण वातानुकुलीत रेल्वेचा प्रारंभ झाला आहे.
प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार्या या 18 डाब्यांच्या गाडीला प्रवासी उपलब्धतेनुसार आठवड्यातून तीन दिवस धावेल असे प्रयत्न खासदार डॉ. हिना गावीत करणार आहेत. नंदुरबार येथून रात्री 12ः35 वाजता निघणारी ही संपूर्ण वातानुकूलित गाडी वापी (19.17), बलसाड (19.45), उधना (21.05), नंदुरबार (10.00), जबलपुर (13.40), कटनी (15.05), सतना (16.45), अलाहबाद (20.25), मोकलसराय (22.40) व पटना (2.30) व परतीच्या प्रवासात बान्द्रा येथून गुरूवारी (7.35) नंदुरबार येथून बुधवारी (रात्री 11.58) निघेल.