दलाई लामा यांना अरुणाचल प्रदेशात प्रवेश दिल्याने चीन भडकला

0

इंफाळ । तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांना अरुणाचल प्रदेशात प्रवेश देत भारताने खूप मोठी चूक केली असल्याचं चीनने म्हटले आहे. सीमारेषेवरील राज्यात दलाई लामा यांना प्रवेश दिल्यामुळे चीन भारताविरोधात आपला राग व्यक्त करीत आहे. तसेच, दलाई लामांच्या अरुणाचल भेटीने द्विपक्षीय संबंधांना फटका बसू शकतो, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लु कांग यांनी म्हटले आहे.

अरुणाचल प्रदेशात दलाई लामा यांनी केलेला प्रवेश चीनला पसंत नाहीये. अरुणाचल प्रदेशातील दलाई लामांच्या कुठल्याही कार्यक्रमाला चीनचा विरोध आहे. यासंदर्भात आम्ही भारताकडे आपली भूमिका मांडत आलो आहे, असंही लु कांग यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानव्याप्त काश्मिरात चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोअर (उझएउ) साठीच्या बांधकामाला भारताने विरोध केला आहे. त्यामुळेच चीनने दलाई लामा यांच्या मुद्द्यावरून भारताला विरोध केला आहे. या कॉरिडोअरसाठी चीनकडून पायाभूत सुविधांचं बांधकाम सुरु असून चीनने या मुद्यावरूनही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कॉरिडोअरमुळे भारताच्या काश्मीर प्रश्नावर कोणताही प्रभाव पडणार नसून भारताला चिंता करण्याची गरज नाहीये असंही चीनने म्हटलंय. दलाई लामा हे फुटीरतावादी कारवायांमध्ये सक्रिय आहेत. तरीही भारत दलाई लामांना निमंत्रण देऊन मोकळीत देत आहेत.