भुसावळसह मुक्ताईनगरात प्रशासनाला निवेदन : दोषींवर कारवाईचीी मागणी
भुसावळ- बहुजन समाजातील बांधवांवर होणार्या अन्याय-अत्याचाराच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने भुसावळ विभागात शनिवारी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येवून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. भुसावळ शहरातील प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर सकाळी 11 ते सायंकाळी पाच दरम्यान तर मुक्ताईनगरातही दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले.
बहुजन समाजावरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ
भुसावळ- वाकडी, ता.जामनेर येथील मातंग समाजाच्या मुलांची नग्न धिंड काढून मारहाण करणार्यांवर कारवाई करावी, रुद्रवाडी, ता.उदगीर येथे मातंग कुटुंबावर हल्ला करणार्यांवर कारवाई करावी, पूजा सकटच्या मृत्यूची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, नाराणयगाव येथे कैकाडी समाजावर अन्याय, अत्याचार करणार्यांवर कारवाई करावी, भीमा-कोरेगाव दंगलीचे मुख्य सुूधार भिडे-एकबोटे यांना वाचविण्यासाठी चौकशी आयोगाद्वारे फिर्यादी, साक्षीदार, पोलिस कर्मचारी व पोलिस पाटील यांच्यावर खोटे प्रतिज्ञापत्र देण्यासाठी दबाव टाकणार्या अधिकार्यांवर कारवाई करावी, धनगर आरक्षणासाठी चोंडी येथे आंदोलन करणार्या कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावी व संबंधित दोषींर कारवाई करावी, जळगाव येथील समता नगरातील मेहतर समाजाच्या बालिकेचे अपहरण करून अत्याचार करणार्या नराधमांवर कराई करणे, भालोद, ता.यावल येथील रजनीकांत डोळे या तरुणावर गावतील 17 सवार्णांनी शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपींवर कारवाई करावी आदी मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
यांचा आंदोलनात सहभाग
भुसावळातील धरणे आंदोलनात बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक शे.हारून कडू मन्सुरी, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी अनिस अहमद, मूलनिवासी महिला संघाच्या प्रेमा पाने, तालुकाध्यक्ष चंद्रभान जधव, सिंधू जाधव, सईसा मन्सुरी, राष्ट्रीय मुल निवासी कर्मचारी संघ कार्याध्यक्ष रवींद्र गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मुक्ताईनगरात धरणे आंदोलन
मुक्ताईनगर- तहसील कार्यालयाबाहेर झालेल्या धरणे आंदोलनात मुक्ताईनगर तालुका संयोजक किशोर धायडे, शहर संयोजक सिद्धार्थ हिरोळे, कोमल तायडे, उज्ज्वला इंगळे, अलका चिकणे, निर्मला सपकाळे, संगीता तायडे, छाया धायडे, विजय इंगळे, सरीता पवार, जिजाबाई भारसाकळे, पुरूषोत्तम भारसाकळे, संतोष गायकवाड, राष्ट्रपाल धुरंधर, प्रशांत झाल्टे, बुद्धभूषण हिरोळे, महेंद्र हिरोळे, सिद्धार्थ हिरोळे, पारस हिरोळे, बबलू वानखेडे, नितीन सावळे, योगेश यादव, सुपडू हिरोळे , विशाल हिरोळे, विजय इंगळे, किशोर बोदडे, शुभम पालवे, नीलेश हिरोळे, निशांत झाल्टे आदी सहभागी झाले होते.