भुसावळ । राष्ट्रीय दलित पँथर संस्थेची बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात घेण्यात आली. यामध्ये महिला कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. महिला आघाडी शहरप्रमुखपदी रंजना सोनवणे व उपप्रमुख निर्मला पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सोनवणे, जिल्हाप्रमुख सुदाम सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष विजय साळवे, ग्रामीण जिल्हाप्रमुख राजू महाले, उपप्रमुख रविंद्र सोनवणे, जिल्हा सरचिटणीस प्रेमचंद सुरवाडे, सुनिल सुरवाडे, गोविंदा सोनवणे, भोजराज सोनवणे, मुकुंद महाले, कैलास सोनवणे उपस्थित होते.