दलित समाजावरील अत्याचारांची चौकशी करा

0

धुळे। उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे दलित समाजावर जातीय अत्याचार करण्यात आला. उत्तर प्रदेशसह देशभरातील दलितांवर होणार्‍या अत्याचारात लक्षणीय वाढ झाली असून ही चिंतचीबाब असून उत्तर प्रदेशात घडलेल्या जातीय अत्याचाराची चौकशी होऊन दोषींवर कडक करावी करण्याची मागणी राष्ट्रीय दलित पँथरतर्फे जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या कृतीचा निषेध
जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या निवेदनात पुढे आहे की, जातीय हल्ल्याचा पार्श्‍वभूमींवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जातीय हिंसाचारग्रस्त गावाला भेट देण्याआगोदर दलितांना आंघोळीसाठी साबण व तेल देऊन जातीय व्यवस्था ठळकपणे पुढे आली असल्याचे म्हटले आहे. योगी हे दलित विकासाची भाषा करीत असले तरी त्यांची कृती जातीव्यवस्था समर्थनाची असल्याचे म्हटले आहे. योगी यांच्या कृतीचा निषेध राष्ट्रीय दलित पँथर करीत असून जातीय हिंसाचार करणार्‍यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी पँथरचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ वाघ, उपजिल्हाध्यक्ष विशाल थोरात, सिद्धार्थ बैंसाणे, आनंद वाघ, केतन साळवे, जितेंद्र बोरसे, राहुल अहिरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.