पिंपरी- पिंपरीतील दळवीनगर झोपडपट्टीत गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दोन जणांचा मृत्यू झाला. प्रदीप मेटे आणि शंकर क्षीरसागर अशी या घटनेत मयत झालेल्यांची नावे आहेत. आगीमध्ये होरपळून मृत्यू झालेल्या दोघांतील शंकर क्षीरसागर हा तृतीयपंथी आहे, त्यांना भेटण्यासाठी प्रदीप मोटे हे रात्री उशिरा आले होते. पहाटे ३ वाजता सुमारास ही भीषण घटना घडली यात प्रदीप आणि शंकर यांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
शंकर सोबत भाचा,आई,बहीण,दाजी हे सर्व एकत्र घरात राहतात ते या भीषण अपघातातून बचावले आहेत. प्रदीप आणि शंकर यांच्यात चांगले मैत्रीचे संबंध होते. अशी माहिती चिंचवड पोलीस ठाण्याचे गुन्हे पोलीस निरीक्षक व्ही.व्ही.खुळे यांनी दिली आहे. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.