दशामाता उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

0

नंदुरबार। दशामाता उत्सवानिमित्त सर्वत्र धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असून त्यामुळे धार्मिक वातावरण आहे. दशा माता उत्सव नजीकचा गुजरात राज्यातला प्रमुख सणांपैकी एक असला तरी गेल्या दशकापासून जिल्ह्यासह खान्देशात मोठ्या भक्तिभावाने उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

नवसाला पावणारी देवी म्हणून आख्यायिका आहे . गेल्या आठवड्यात मातेची विधिवत प्रतिष्ठापणा करण्यात आली. उत्सव दरम्यान ठिकठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात येत आहे. सायंकाळचा आरती नंतर रात्री उशिरापर्यंत महिला वर्ग रास गरबा खेळण्यात दंग झाल्या आहेत. शहरातील कामनाथ महादेव मंदिर परिसरातील लक्ष्मी नारायण नगरात संजय नरसिंग पाटील यांचा घरी झुल्यावर आकर्षकरित्या सजावट करून दशा मातेची स्थापना करण्यात आली आहे. मातेचा दहा दिवसाचा उत्सव महिलांसाठी पर्वणीच आहे.