जळगाव । शहरातील स्वामी विवेकानंद बहुउद्देशि मंडळाच्या वतीने 21 मे रोजी दहशतवादविरोधी दिनानिमित्त दहशतवादविरोधी नागरीशक्ती मुक रॅली तसेच दहशतवाद प्रतिमेचे प्रतिकात्मक दहन, हुतात्म्यांना आदरांजली आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. दहशतवादी संघटनांकडून देशाला असलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या प्रेरणेने उपक्रम राबवण्यात येणार असून शासकीय स्तरावर देखील दहशतवाद विरोधी दिन साजरा व्हावा शासनाच्या वतीने जी. आर असताना मात्र टाळाटाळ करण्यात येते. राष्ट्रीय उपक्रम म्हणून जळगाव पॅटर्न राज्यात प्रसिद्धीस येणार असल्याचे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले.
21 मे रोजी शहरातून निघणार मूकमोर्चा
शनिपेठेतील महर्षी वाल्मीकी चौकातून 21 मे रोजी सकाळी 10 वाजता दहशतवाद निषेध मुक रॅलीला सुरवात होणार आहे. रॅलीत सहभागी नागरिक, विद्यार्थी तसेच विविध सामाजिक, स्वयंसेवी संघटना व संस्थांचे सदस्य काळ्या फिती लावून दहशतवादाचा निषेध नोंदवतील तसेच दहशतवाद विरोधी नागरी शक्तीचे प्रतिकात्मक स्वरुपात प्रदर्शन करतील. देशभरात विविध शहरांतून झालेल्या दहशतवादी व नक्षलवादी हल्ल्यात हुतात्मा ठरलेल्या सैनिकांना, पोलिसांना तसेच नागरिकांना श्रद्धांजली वाहून रॅलीचा समारोप होईल. तत्पूर्वी दहशतवादाच्या प्रतिमेचे प्रतिकात्मक दहन होईल. सर्वधर्मिय नागरिकांचा सहभाग हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असेल. अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. यावेळी शिवसेनेचे गजानन मालपूरे परिवर्तन नाटयसंस्थेचे शंभु पाटील, युवा शक्तीचे विराज कावळीया, अमित जगताप आदी उपस्थित होते. शहरातील मुख्य महामार्गवारुन शांताता प्रिय आणि असा मुक मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले आहेत. राष्ट्रीय एकात्मतेचे स्वरुप या दशतवादी विरोधी दिनाच्या दिवशी जनआंदोलन म्हणून पुढे येईल. असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे.
सहभागी होण्याचे आवाहन : सर्वच पक्षांतील पदाधिकार्यांनी, कार्यकर्त्यांनी आपले वैचारिक मतभेद बाजूला ठेऊन एक भारतीय म्हणून या उपक्रमात सहभाग नोंदवावा. किंबहूना आम्ही तसे रितसर पत्र सर्व राजकीय पक्षांतील पदाधिकार्यांना व कार्यकर्त्यांना पाठवणार आहोत. राजकीय पक्षांसह शहरातील विविध संघटना, संस्था, शासकीय तसेच निमशासकीय व स्वायत्त संस्था आस्थापनातील सदस्यांनीही रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
राजकारण विरहीत राष्ट्रीय कार्यक्रम
उपक्रमामागची भूमिका विषद करताना कैलास सोनवणे यांनी सांगितले की, भारतात गेल्या 23 वर्षात 35 हजार लोक दहशतवादाचे बळी ठरलेले आहेत, असे एक आकडेवारी सांगते. पाकिस्तानातून भारतात आलेले अनेक लोक पाकिस्तानात परत गेलेलेच नाहीत, हे लोक दहशतवादी असण्याची तसेच भारतात घातपात घडवून आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या पार्श्वभूमीवर हा उपक्रम आयोजित केल्याचे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी सांगितले. नागरिकांमध्ये दहशतवादविरोधी जागरुकता आणण्याचा उद्देशही आहेच. सोनवणे म्हणाले की, उपक्रम हा कुठल्याही राजकीय पक्षाचा नसून राष्ट्रीय स्वरुप देऊन सर्व व्यापी दहशतवाद विरोधी जनआंदोलन असणार आहे.