दहशतवादी हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू

0

तेहरान । इराणी संसद आणि खोमेनी यांच्या स्मृतीस्थळाजवळ झालेल्या हल्ल्यामध्ये 7 व्यक्तींनी प्राण गमावले आहेत. इराणी संसदेतील सूत्रांनी प्रसिद्धीमाध्यमांना सांगितलेल्या माहितीनुसार इराणी संसदेत 7 व्यक्ती ठार झाल्या असून संसदेच्या वरच्या मजल्यावर अद्याप 4 जणांना ओलीस ठेवण्यात आले होतेे. संसदेवर तीन हल्लेखोरांनी हल्ला केला. त्यापैकी दोघांकडे एके 47 रायफल होती तर एकाकडे हँडगन होतेे. खोमेनी स्मृतीस्थळावर झालेल्या हल्ल्यामध्ये एका महिलेने स्वतःला उडवून दिल्याचे स्थानिक माध्यमांद्वारे सांगण्यात आले.

हल्लेखोरांचा खात्मा झाला
येथील स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, तीन अज्ञात बंदुकधारी हल्लेखोर संसदेच्या आवारात घुसले. त्यानंतर हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. हल्लेखोर आणि सुरक्षा रक्षक यांच्यात चकमक झाली.त्यावेळी काही लोकांना हल्लोखारांनी ओलीस ठेवल्याचे समजते. याचबरोबर, दुसरीकडे येथील दक्षिण तेहरानमधील खोमेनी स्मृतीस्थळाजवळ सुद्धा हल्लेखोरांनी हल्ला केला. इराणच्या लष्कराने रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले. त्यात हल्लेखोरांचा खात्मा झाला आहे.

जबाबदारी इसिसने स्वीकारली
इराणी संसद आणि खोमेनी यांच्या स्मृतीस्थळाजवळ बुधवारी दुपारी दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. हल्लेखोरांनी संसदेतील लोकांना ओलीस ठेवले होते. हल्लोखोर आणि सुरक्षा रक्षक यांच्यात झालेल्या चकमकीत हल्लेखोरांचा खात्मा करण्यात आल्याचे सांगण्यात येते.