दहावीचा निकाल ८ किंवा ११ तारखेला

0

मुंबई-महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल येत्या दोन ते चार दिवसांनी लागणार असल्याचे संकेत आहेत. सूत्रांच्या सांगण्यानुसार दहावीचा निकाल तयार असून तो शुक्रवार ८ जून किंवा सोमवार ११ जून यापैकी कुठल्याही दिवशी लागू शकतो. शिक्षण मंडळानं अधिकृतरीत्या याबाबत कुठलीही घोषणा केलेली नाही. परंतु मंडळाच्या अधिकाऱ्यांनी विविध प्रसारमाध्यमांशी बोलताना ८ जून किंवा ११ जून रोजी निकाल जाहीर होऊ शकतो असे संकेत दिले आहेत.