दहावीच्या परिक्षेत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी

0

भुसावळ । राज्य माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात शहर व परिसरातील बहुतांश विद्यालयांनी 90 टक्क्यांवर निकाल लागला असून विद्यार्थ्यांनी यात घवघवीत यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचा सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

के.नारखेडे विद्यालय
येथील के. नारखेडे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेत उत्कृष्ट कामगिरी बजावून घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यार्थीनी मृदूल प्रमोद चौधरी एसएससी परिक्षेत 98.80 टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम आली. तिला ए. के. पाटील, लता चौधरी यांसह शाळेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

अनिकेत अनिल सोनवणे या विद्यार्थ्यास 84 टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झाला. त्याला आई-वडिलांचे व मामा-मावशीचे मार्गदर्शन मिळाले. अनिकेत याने प्रशासकीय सेवेत करिअर करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

गौरव नेवे याचे यश
येथील सेेंट अलॉयसेस हायस्कूलचा इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी गौरव प्रशांत नेवे 10 वी एसएससी परीक्षेत 89.00% गुण मिळवून विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झाला. विशेष उल्लेखनीय असे की, गौरव यास गणित विषयात 100 पैकी 98 गुण मिळाले आपल्या यशात शिक्षक व आई वडीलांचे मार्गदर्शनामुळे यश संपादन केले असल्याचे मनोगत त्याने व्यक्त केले.

सरदार जी.जी. हायस्कूल
रावेर येथील सरदार जी.जी. हायस्कूलचा निकाल 94.44 टक्के लागला. शाळेतुन 252 विद्यार्थी परिक्षेत बसले होते. त्यापैकी 238 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाळेतुन प्रथम अक्षय दत्तात्रय खारे 96.20, द्वितीय ललित ज्ञानेश्वर महाजन 94, तृतीय गुणल युवराज कट्यारमल 93.60 मिळवुन उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन प्रकाश मुजुमदार, संचालक मंडळ मुख्याध्यापक एल.डी. अंतुर्लीकर, आदींनी अभिनंदन केले.

डी.एस. देशमुख विद्यालय
रावेर तालुक्यातील डी.एस. देशमुख विद्यालयाचा 88.50 टक्के निकाल लागला. यात मोहिना कोलते 88.40, गायत्री पाटील 86.60 टक्के मिळाले तर भाग्यश्री पाटील 81.20 मिळाले. यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे संचालक माजी आमदार आर.आर. पाटील, सचिव दिनेश पाटील यांनी सत्कार केला.

महाराणा प्रताप विद्यालय
महाराणा प्रताप विद्यालयाचा निकाल 98.51 टक्के लागला. यात जय जांभळे 91.80 टक्के, हेमंत पाल 90.80, जय पोतदार 91.20, अनिकेत गवळी 90.60 टक्के गुण मिळविले.

अलहिरा उर्दू स्कुल
अलहिरा उर्दू शाळेचा 90.74 टक्के निकाल लागला यात अस्मार अहमद खान याने 89 टक्के मिळविले. आयेशा कौसर मोईनुद्दीन 88.80, मोहम्मद अदनान मोहम्मद सलिम 87.60
टक्के मिळाले.

अग्रवाल गर्ल हायस्कूल
कमलाबाई अग्रवाल गर्ल्स हायस्कूलचा निकाल 90.68 टक्के लागला. यात तेजस्विनी रमेश पाटील हिने 96.20 टक्के मिळविले. द्वितीय क्रमांक मृणाल रमेश साबळे 95.80 टक्के, दिव्याराणी हेमंत बाणाईत 95.60 टक्के गुण मिळवुन उत्तीर्ण झाले. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

जे.ई स्कुल, मुक्ताईनगर
येथील जे.ई स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यात शितल दिलीप पाटील 94.80 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. रुतिका तायडे हिने 94.40 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला. लिना झांबरे 94.20 टक्के, अर्पणा भागवत हिला 94.20 टक्के गुण मिळाले. जयेश किशोर बोरसे याला 93.40 टक्के गुण मिळाले. तो काकोड येथील प्राथमिक शिक्षक किशोर बोरसे यांचा मुलगा आहे.

महात्मा गांधी विद्यालय, वरणगाव
येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ विद्यालयाची विद्यार्थीनी निकीता गौतम इंगळे हिला दहावीच्या परिक्षेत 92.20 टक्के मिळाल्याने तीचे शिक्षक व प्राचार्य आर.आर. निकुंभ यांनी कौतुक केले असून तिची आजी उषाबाईनी मार्गदर्शन केले आहे. वरणगाव परिसरात निकीताचे अभिनंदन होत आहे.

अहिल्यादेवी कन्या विद्यालय
संत ज्ञानेश्‍वर शिक्षण मंडळ संचलित अहिल्यादेवी कन्या विद्यालयाचा निकाल 98.52 टक्के लागला. यात वैशाली धांडे हिने 94 टक्के मिळवून प्रथम क्रमांक मिळविला तर साक्षी देशपांडे हिने 93.60 टक्के गुण मिळवून द्वितीय आली. अर्पिता झोपे हिला 92 टक्के मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. विद्यालयातून 90 च्या वर एकूण नऊ विद्यार्थीनींसह विशेष प्राविण्यासह 85 विद्यार्थीनींनी गुण मिळविले. गुणवंत विद्यार्थीनींचा अध्यक्ष बापू मांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष सोनू मांडे, चिटणीस उषा पाटील, मुख्याध्यापिका प्राची देसाई, पर्यवेक्षक सुरेश शिंदे उपस्थित होते. सुत्रसंचालन विनोद उबाळे यांनी केले तर आभार आशिष निरखे यांनी मानले.