जळगाव। राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणार्या दहावीची परीक्षा सध्या सुरु आहे. गुरुवारी 16 रोजी दहावीची भुमिती या विषयाची परीक्षा घेण्यात आली. यात धरणगाव येथील इंदिरा गांधी कन्याशाळेतील एका विद्यार्थ्यांजवळ कॉफी आढळल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
माध्यमिक शिक्षणाधिकारी याच्या पथकाने ही कारवाई केली. जिल्हा भरात कॉफीमुक्त अभियान राबविले जात आहे मात्र सर्रासपणे कॉफी केली जात असल्याचे आतापर्यत दिसुन आले आहे. जिल्ह्याभरात होणार्या या परिक्षांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 15 भरारी तसेच फिरते पथक नेमण्यात आले आहे. पथक असतांनाही विद्यार्थ्यांमध्ये पथकाबद्दल धाक नसल्याचे दिसते.