दहावीच्या विद्यार्थ्यांना मोबाईल अ‍ॅपचे वाटप

0
सुनील शेळके यांनी राबविला उपक
वडगाव मावळ : तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शंकरराव शेळके व माय मावळ फाउंडेशनच्यावतीने मावळ तालुक्यातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मोबाईल अ‍ॅप देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. तालुक्यातील 68 माध्यमिक शाळांतील सहा हजार 240 विद्यार्थ्यांना आयडीयल 102 हे मोबाइल अ‍ॅप मोफत देण्यात आले. ऑक्टोबर अखेर मावळ तालुक्यातील सर्वच विद्यार्थ्यांना हे अ‍ॅप देण्यात आले. विद्यार्थी वर्गातून सुनील शेळके यांच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून यावर्षी दहावीचा अभ्यासक्रम बददला असून 1 मार्च 2019 पासून, दहावी बोर्डाची परीक्षा  होणार आहे. आयडीयल 10 हे मोबाईल ऍप मराठी, इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमातून असून, दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरत आहे. यात विद्यार्थी व शिक्षकांना येणार्‍या अडचणी सहज सोप्या होण्यासाठी विद्यार्थ्यांचा अभ्यास सोपा व सुलभ व्हावा यासाठी आयडीयल 102 हे मोबाइल अ‍ॅप देण्यात आले.
दहावीचा अभ्यासासाठी अ‍ॅप महत्वाचे
माजी नगराध्यक्ष सुनील शेळके म्हणाले की, शिक्षणाची आस असलेले अनेक विद्यार्थी जि.प.शाळांमध्ये शिक्षण घेत असतात. त्यांना अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये शिक्षणासाठी प्रयत्न करीत असतात. डोंगरदर्‍यात रहाणार्‍या आर्थिक दुर्बल व आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना प्रतिकूल परिस्थितीमध्ये दहावीचा अभ्यास करावा लागतो. त्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होण्यासाठी आयडीयल 102 हे मोबाइल अ‍ॅप महत्वाचे आहे. मावळ तालुक्यातील माध्यमिक शाळेच्या सर्वच विद्यार्थ्यांना वाटप केले आहे.