पुणे : पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दहावीत गणित विषयाला 10 गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा असणार आहे. तर नववीच्या विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षापासूनच गणिताची प्रॉक्टिकल परीक्षा द्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना गणितातील संकल्पनांचे आकलन चांगल्याप्रकारे व्हावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सोमवारी हा निर्णय जाहीर करण्यात आला. इयत्ता नववीसाठी चालू शैक्षणिक वर्ष या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. तर पुढील शैक्षणिक वर्षापासून दहावीच्या प्रत्येक सेमिस्टरसाठी गणित या विषयाला 10 गुणांची प्रॅक्टिकल परीक्षा असेल.