मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शुक्रवार, 17 रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. दहावी परीक्षेसाठी 16 लाख 38 हजार 964 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 8,89,506 मुलं असून मुलींची संख्या 7,49,458 एवढी आहे. हा निकाल 17 जून 2022 रोजी दुपारी एक वाजता http://www.mahresult.nic.in या वेबसाईटवर जाहीर होणार आहे.
अखेर उत्कंठा संपली
गेल्या काही दिवसांपासून इयत्ता 10 वीचा निकाल केव्हा लागणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता होती. अखेर आज राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता 10 वीच्या निकालाची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे. त्यानुसार उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीनं इयत्ता 10 वीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.